St. Xavier's School, Manickpur
आपल्या सेंट झेविअर्स हायस्कूल माणिकपूर वसई मराठी माध्यम शाळेत प्रवेश घेणारा विद्यार्थी गरीब, अनाथ , किव्हा भंगलेल्या कुटुंबातील असतो पण ह्या आपल्या ज्येवेट शाळेत त्याला पूर्ण आधार दिला जातो चांगल्या संस्कारात त्याची शैक्षणिक जडणघडण केली जाते .आपल्या संस्थेचे ध्येय तेच आहे कुठलाही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये
St. Philomena School, Manickpur
संत फिलोमिना मराठी विद्यालय ही डि.एड. कॉलेजची सराव पाठशाळा आहे. ह्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. सर्व विद्यार्थी तळागाळातील व गरीब कुटुंबातील आहेत. ह्या जेज्वीट शिक्षण संस्थेत शैक्षणिक विकासाबरोबर आध्यात्मिक विकासही घडविला जातो. शाळेत वर्षभरात विविध सहशालेय उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात. प्रभावी फॉनिटिक पध्दत वापरुन इंग्रजी शिकविले जाते. शाळेमध्ये गणित विषय सेमी इंग्रजीत शिकविण्याचा प्रयोग इयत्ता पहिलीपासून सुरू केला आहे. शाळेत स्पिकरचा वापर करून विविध भाषेतील गाणी व गोष्टी शिकवितात. शैक्षणिक साहित्याच्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिले जाते. शेवटी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच इग्नातीप्रणीत शिक्षणाचे उच्चतम ध्येय आहे.